ग्रामीण शिक्षण म्हणजे केवळ शाळेच्या चार भिंतींमध्ये दिले जाणारे शिक्षण नाही; तर ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जीवनाशी, अनुभवांशी आणि भविष्यातील संधींशी जोडलेले शिक्षण आहे.Vidyavistar या उपक्रमामागील मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी यांच्यापर्यंत गुणवत्तापूर्ण आणि उपयुक्त शैक्षणिक माहिती पोहोचवणे हा आहे.आज शिक्षणक्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020), नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, डिजिटल शिक्षण, अनुभवाधारित अध्ययन, कौशल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.या वेबसाइटच्या माध्यमातून शिक्षकांसाठी अध्यापनातील उपयुक्त मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी अध्ययन-साहित्य, शैक्षणिक लेख, उपक्रम, प्रश्नपत्रिका, शिक्षक प्रशिक्षणासाठी सामग्री आणि शिक्षणक्षेत्रातील विविध विषयांवरील माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.ग्रामीण वर्गखोली आणि नाविन्यपूर्ण शिक्षणग्रामीण शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या स्थानिक साधनांचा, विद्यार्थ्यांच्या अनुभवांचा आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अध्यापन अधिक आनंददायी व परिणामकारक करता येते.शिक्षक हा केवळ माहिती देणारा व्यक्ती नसून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला दिशा देणारा मार्गदर्शक असतो. त्यामुळे “शिकवणे” आणि “विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सक्षम करणे” यामध्ये फरक समजून घेणे आवश्यक आहे.Vidyavistarचा संकल्पVidyavistar हा शिक्षणातील विचार, अनुभव आणि उपयुक्त साधने अधिकाधिक शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे.या प्रवासात शैक्षणिक लेखन, शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल शैक्षणिक साधने, ग्रामीण शिक्षणातील नाविन्यपूर्ण प्रयोग आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपयुक्त सामग्री यांना विशेष स्थान असेल.चला, ज्ञानाचा विस्तार करूया आणि शिक्षणाला ग्रामीण वर्गखोलीपासून व्यापक समाजापर्यंत पोहोचवूया.— प्रदीप बागुल
